✨ Fudan New IOGG Program Open!

2nd Round closes in Loading... !
View Details

खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?

Source: Lokmat.com | Original Published At: 2025-07-07 04:19:00 UTC

Key Points

  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्सच्या अमेरिका विरोधी धोरणांना समर्थन करणाऱ्या देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे.
  • ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडियावर पोस्ट करून हा इशारा दिला आहे.
  • हे टॅरिफ धोरण कोणत्याही देशाला सोडल्याशिवाय लागू केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Donald Trump Brics Tariff Update: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ वसूल करण्याची धमकी दिली आहे. ब्रिक्सच्या अमेरिका विरोधी धोरणांना पाठिंबा देणाऱ्या देशांकडून १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू, असे ट्रम्प म्हणाले आहेत.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडियावर एक पोस्ट करून ब्रिक्सच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त केला.

१० टक्के अतिरिक्त टॅरिफ

ट्रम्प म्हणाले, “ब्रिक्सच्या अमेरिका विरोधी धोरणांशी जोडून घेणाऱ्या कोणत्याही देशावर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्यात येईल. यात कोणालाही सोडलं जाणार नाही. या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल आभार”,असा धमकीवजा इशाराच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

US President Donald Trump posts on his Truth Social, “Any Country aligning themselves with the anti-American policies of BRICS, will be charged an ADDITIONAL 10% Tariff. There will be no exceptions to this policy. Thank you for your attention to this matter.” pic.twitter.com/iUZR6fHSUS

Scroll to Top