✨ Fudan New IOGG Program Open!

2nd Round closes in Loading... !
View Details

पीएम मोदींना आता रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, आतापर्यंत 16 देशांनी मोदींचा केलाय सन्मान

पीएम मोदींना आता रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, आतापर्यंत 16 देशांनी मोदींचा केलाय सन्मान
Cooperation areas

Source: TV9 Marathi | Original Published At: 2024-07-09 15:14:43 UTC

Key Points

  • पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल' प्रदान करण्यात आला.
  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वतः पुरस्कार प्रदान केला.
  • द्विपक्षीय चर्चेत दहशतवाद, सहकार्य आणि शांतता यावर चर्चा झाली.
  • रशियाने भारताच्या सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दर्शविला.
  • मोदींचा रशिया दौरा यशस्वी झाल्याचे रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी सांगितले.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल देऊन सन्मान केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. हा सन्मान 2019 मध्ये घोषित करण्यात आला होता. रशियानंतर पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या ऑस्ट्रिया दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवाद, परस्पर सहकार्य आणि शांतता प्रस्थापित करण्यावर चर्चा झाली. याआधी भूतान, इजिप्त आणि फ्रान्ससह अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की प्रिय मित्र, या सर्वोच्च रशियन पुरस्काराबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला चांगले आरोग्य आणि यश मिळो ही शुभेच्छा. मी भारतातील मैत्रीपूर्ण लोकांसाठी शांतता आणि समृद्धीची इच्छा व्यक्त करतो.

पंतप्रधान मोदींचा दौरा अत्यंत यशस्वी : सर्गेई लावरोव

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव म्हणाले की, ही भेट खूप यशस्वी झाली. पीएम मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी द्विपक्षीय अजेंडाच्या प्रत्येक पैलूवर चर्चा केली. आंतरराष्ट्रीय परिस्थिती, G-20, BRICS, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्समधील आमचे सहकार्य यावर चर्चा झाली, जिथे भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य होण्यासाठी आम्ही पाठिंबा देतो. दोन्ही देशांमध्ये समन्वय आहे. द्विपक्षीय अजेंडा आणि आंतरराष्ट्रीय धोरणांशी संबंधित मुद्द्यांवर समान समज आहे. मला खात्री आहे की या भेटीमुळे सर्व क्षेत्रांना मोठी चालना मिळेल.

Scroll to Top